जनशक्ती (वृत्तसेवा)- अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस सुसाट सुटली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पहिल्याच टप्प्यात सोसायटी मतदारसंघातील पाच जागा बिनविरोध झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहेत. मात्र यावर अधिकृत शिक्कामोर्तब उमेदवारी अर्ज माघारीनंतरच होणार आहे. एकाच उमेदवाराचे अनेक अर्ज,
अपूर्ण अर्ज, आक्षेप घेतलेले अर्ज निवडणुकीच्या रिंगणात अवैध ठरले आहेत. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी १६ जागांसाठी २३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
दाखल आक्षेपांमध्ये एकूण १४ हरकती दाखल झालेल्या होत्या. यावर मंगळवारी रात्री उशीरा सुनावणी पूर्ण झाली. त्यावर आज निर्णय झाला. सोसायटी मतदारसंघातील पाथर्डी येथील उमेदवार आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विरोधात शेटे यांनी हरकत घेतली होती. ती हरकत फेटाळण्यात आल्याने आमदार राजळे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. तसेच श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार राहुल जगताप व त्यांच्या पत्नी प्रणोती जगताप यांच्या अर्जावर प्रताप पाचपुते यांनी घेतलेली हरकत फेटाळण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातून राहुल जगताप यांची उमेदवारी अंतिम झाली.
या पाच जागा बिनविरोध-
डॉ. सुजय विखे पाटील (राहता)
रणजीत देशमुख (संगमनेर)
माजी मंत्री शंकरराव गडाख (नेवासा)
माजी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील (शेवगाव),
आमदार बिपिनदादा कोल्हे (कोपरगाव)
या जागा पहिल्या टप्प्यात बिनविरोध झाल्या आहेत. परंतु, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी यावर शिक्कामोर्तब होईल. सोसायटी मतदारसंघ अकोले- किरण लहामटे, शरद चौधरी, संजीवनी शिंदे, सिताराम गायकर, बाळासाहेब भोर, रावसाहेब वाकचौरे, कैलास वाकचौरे, वैभव पिचड, विकासराव शेटे, मधुकर नवले, चंदर बांडे. जामखेड- सचिन घुमरे, अमोल राळेभात, सुधीर राळेभात. कर्जत- तुषार पिसाळ, अंबादास पिसाळ, देविदास देशमुख, मंगेश जगताप, मंजुषा गुंड, ज्योती शिंदे, सुरेश साळुंखे, किरण पाटील, काकासाहेब तापकिर, कैलास शेवाळे. कोपरगाव- बिपिनदादा कोल्हे, विवेक कोल्हे. नगर- बाळासाहेब हराळ, प्रताप शेळके, अक्षय कर्डिले. नेवासा – शंकरराव गडाख, पारनेर – गीतांजली शेळके, काशिनाथ दाते, निलेश लंके, राहुल शिंदे. पाथर्डी-मोनिका राजळे, कडूचंद शेटे, ऋषिकेश ढाकणे. राहाता- सुजय विखे पाटील, भास्करराव खडे. राहुरी- प्राजक्त तनपुरे, हर्ष तनपुरे, सत्यजित कदम. संगमनेर- रणजीतसिंह देशमुख. शेवगाव- राजश्री घुले, चंद्रशेखर घुले. श्रीगोंदा- राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अर्चना पानसरे, दत्तात्रय पानसरे, प्रणोती जगताप, अण्णासाहेब शेलार, प्रतापसिंह पाचपुते, सुधीर नलगे, अनुराधा जगताप, संध्या महांडुळे. श्रीरामपूर- करण ससाणे, सोन्याबापू शिंदे, रणजीत बनकर, सोपानराव राऊत.अनुसूचित जातीजमाती- किरण लहामटे, तुकाराम मेंगाळ, प्रकाश सदाफुले, वैभव पिचड, प्रशांत लोखंडे, बाळासाहेब गंभीरे, मंगल शेलार, पंढरीनाथ इल्हे, अमित भांगरे, रावजी मधे, विकास गायकवाड, अजिंक्य बोरूडे.
ओबीसी- प्रशांत गायकवाड, आजिनाथ हजारे, अण्णासाहेव शेलार, शरद चौधरी, करण ससाणे, नितीन खेतमाळीस, अंकुश शेळके, कडूचंद शेटे, केशव बेरड, शंकर साठे, शिवाजी मते, अर्चना पानसरे, अश्विनी देशमुख, अनिल शिरसाठ, दत्तात्रय पानसरे, पांडुरंग सोले पाटील, सुखदेव बागल, दादासाहेब सोनमाळी, कारभारी जावळे, कर्डिले रोहिदास, जालिंदर वाकचौरे, दिलीप रासकर, प्रतापसिंह पाचपुते, प्रतिभा पाचपुते, मधुकर नवले, शिवदास गुंजाळ, प्रवीण लोखंडे, परीक्षित भोर, विठ्ठलराव लंघे, हर्षदा काकडे, बाळासाहेब देशमुख, अर्जुनराव बोरुडे, राहुल जगताप, रणजीत बनकर, नीरज मुरकुटे, शितल म्हस्के, बाळासाहेब नाईकवाडी, किरण पाटील, मंजुषा गुंड, योगिता ताठे, सत्यजित कदम.
शेतीपूरक- राजेंद्र नागवडे, गंगाराम धुमाळ, रामदास आंब्रे, प्रकाश नाईकवाडी, सदाशिव पोखरकर, आशुतोष काळे, रावसाहेब वाकचौरे, अंकुश शेळके, विक्रम देशमुख, भानुदास डोंगरे, त्र्यंबकराव सरोदे, देविदास देशमुख, राजेंद्र जाधव, दत्ता पानसरे, दादासाहेब सोनमाळी, रोहिदास कर्डिले, संदीप शेनकर, विनोद बेलेकर, मधुकर नवले, जयश्री गिरवले, बाळासाहेब देशमुख, शंकर वाळे, वैभव पिचड, रत्नमाला लंघे, सुधीर म्हस्के, शकुंतला चौधरी, दादासाहेब चितळकर, हर्षदा काकडे.
बिगर शेती मतदारसंघ- धनलक्ष्मी हजारे, प्रशांत गायकवाड, राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाईकवाडी, परिघा आरोटो, अविनाश कानवडे, संजय भळगट, नंदकिशोर औताडे, वसंत लोढा, सचिन देसरडा, जनार्दन पठारे, अशोक थोरे, अमोल गर्जे, शंकर साठे, शरदराव थोरात, प्रियंका देशमुख, भाऊपाटील नवले, हाशमभाई पटेल, दत्ता पानसरे, सचिन जगताप, रावसाहेब रोहकले, तुकाराम गुंजाळ, धनंजय गाडेकर, दिलीप रासकर, प्रणोती जगताप, रामनाथ गोल्हार, प्रवीण लोखंडे, प्रतापसिंह पाचपुते, मधुकर नवले, प्रतिभा पाचपुते, शरद झोडगे, राजेंद्र बरबडे, बापूसाहेब नेटके, बाबासाहेब तरटे, दीपक कुऱ्हाडे, पठाण अब्दुलमजीद. महिला राखीव- मंजुषा गुंड, चंदा गर्जे, अनुराधा नागवडे, सुवर्णा लहामगे, संजीवनी शिंदे. सोनल गायकवाड, जयमाला सोलेपाटील, रेखा नवले, शैलजा लोटके, संगीता वाघ, अश्विनी देशमुख, शारदा वाकचौरे, विद्या काळे, रूपाली लुणीया, ज्योती गोलेकर, शारदा खुळे, मनीषा राळेभात, सुप्रिया पाटील,प्रियंका देशमुख, अर्चना पानसरे, लिना ढोकणे, मीनाक्षी साळुंखे, पुष्पा गायकवाड, रत्नमाला उगले, भाग्यश्री राक्षे, सविता वैद्य, सुवर्णा कर्डिले, मंगल शेलार, प्रतिभा पाचपुते, शितल म्हस्के, मनीषा बनकर, योगिता पाटील, गीतांजली शेळके, मृणाली शेलार, सुवर्णा पाचपुते, शकुंतला चौधरी, संध्या महांडुळे, योगिता ताठे विजयालक्ष्मी फाळके, रत्नमाला लंघे, प्रणोती जगताप, अनुराधा जगताप.
एनटी- सुनिता नगरे, अशोक महारनवर, ऋषिकेश ढाकणे, अशोक थोरे, शामराव मुर्तडक, राजेंद्र कोळपे, लक्ष्मण बोठे, सुवर्णा लहामगे, अमोल गर्जे, तुकाराम गुंजाळ, पोपट शेंडगे, गणपतराव सांगळे, रामनाथ गोल्हार, बाबासाहेब गर्जे, राजू जोखर, सोपानराव राऊत, भगवान गंगावणे, दीपक कुर्हाडे आणि दादासाहेब चितळकर यांचा समावेश आहे.

