नगर: अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बसचे अध्यक्ष शिवाजीराव उबाळे यांना SwiftNLift Media Group प्रस्तुत महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार- २०२६ने सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल येथे आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते शिवाजीराव उबाळे यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बसचे अध्यक्ष शिवाजीराव उबाळे यांनी श्री ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात घेतलेल्या भरारीमुळे त्यांची SwiftNLift Media Group ग्रुपने या पुरस्कारासाठी निवड केली. यावेळी बोलतांना शिवाजीराव उबाळे यांनी व्यवसाय उभारताना आलेल्या अडचणी, व्यवसाय करतानाचा संघर्ष व आलेल्या संकटावर कशी मात केली यांची माहिती दिली. तसेच नवउद्योजकांना व्यवसाय उभा करतांना व त्यामध्ये येणाऱ्या अडणींवर कशी मात करावी, याचे मार्गदर्शन केले. यावेळी अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बसचे उपाध्यक्ष प्रमोदजी मुथा, खजिनदार गणेशजी गायकवाड तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजीराव उबाळे यांचे पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

