माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळाला जमली मांदियाळी!

आपला जिल्हा

सोनई (प्रतिनिधी)- सोनई (ता. नेवासा) येथे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी शुक्रवार (दि. 13 नोव्हेंबर) रोजी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी फराळ व स्नेहमेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला सुमारे 11ते 12 हजार कार्यकर्ते, नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. दिवाळीच्या निमित्ताने स्नेह, आपुलकी आणि संवादाचा अनोखा संगम यावेळी पाहायला मिळाला.
या स्नेहमेळाव्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी जेष्ठ नेते मा खा यशवंतराव गडाख यांची विशेष उपस्थिती होती.
तालुक्याच्या विविध गावांतून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे निवासस्थानी दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, सोनई येथील ज्येष्ठ नागरिक मंचाचे सदस्य सोनई वाद्याच्या जयघोषात, वाजतगाजत दिवाळी फराळासाठी दाखल झाले. त्यांच्या आगळ्यावेगळ्या आगमनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, महंत गणेशानंदगिरी महाराज, महंत अवेराज महाराज, महंत ऋषिनाथ महाराज, महंत रमेशानंदगिरी महाराज, ह.भ.प. पंढरीनाथ महाराज तांदळे, ह.भ.प. रामनाथ महाराज पवार, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज हजारे, ह.भ.प. अंकुश महाराज जगताप, ह.भ.प. लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, ह.भ.प. कोंडीराम महाराज पेचे, ह.भ.प. नामदेव महाराज कोरडे, ह.भ.प. के. एम. बाबा फाटके, ह.भ.प. कारभारी महाराज पंडित, ह.भ.प. चंद्रभान महाराज म्हसलेकर, ह.भ.प. गणेश महाराज आरगडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे, ह.भ.प. नंदाताई गवारे, ह.भ.प. सुनीताताई कुसळकर, ह.भ.प. सविताताई दरंदले यांच्यासह तालुक्यातील संत-महंत उपस्थित होते.
तसेच सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, विविध सहकारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, वकील, डॉक्टर, विविध गावांचे सरपंच, शासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, विजयराव गडाख, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनीलराव गडाख, माजी सभापती सुनीताताई गडाख आणि मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केले.
दिवाळी फराळाच्या निमित्ताने आयोजित या स्नेहमेळाव्यातून गडाख कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांमधील जिव्हाळ्याचे संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मोठ्या संख्येने झालेली उपस्थिती आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे हा स्नेहमेळावा आपुलकी वाढवणारा ठरला.