तक्षशिलाच्या विद्यार्थ्यांनी घेतली न्यायाधीशांची मुलाखत

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल देडगाव येथे विधी सेवा समिती नेवासा व नेवासा तालुका वकील संघ यांच्या विद्यमाने कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तक्षशिला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांची मुलाखत घेत विविध कायदेविषक बाबी समजून घेतल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व अतिरिक्त न्यायाधीश नेवासा आर आर हस्तेकर होते. […]

सविस्तर वाचा

तक्षशिला स्कूलचे प्राचार्य विठ्ठल कदम आणि संदीप खाटीक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- रेडिओ बिग एफएम, अहिल्यानगर यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यात तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलमधील प्राचार्य आणि शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य विठ्ठल कदम यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, तक्षशिला ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य संदीप खाटीक यांना आदर्श […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव येथील काळे वस्ती शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना निरोप तर नव्याने आलेल्या शिक्षकांचे उत्साहात स्वागत

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळे वस्ती शाळेतील श्रीमती छजलाने मॅडम यांना निरोप व नवीन शिक्षक गर्जे सर यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला. हनुमाननगर शाळेतून बदली झालेल्या शिक्षिका श्रीमती छजलाने सुमित्रा मॅडम यांना निरोप देऊन आणि नव्याने रुजू झालेले अनुभवी शिक्षक गर्जे संजय सर यांचा सन्मान शालेय शिक्षण […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव ग्रामपंचायतने केलेल्या विकासकामाबद्दल हनुमाननगर शाळेकडून कृतज्ञता व्यक्त

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामपंचायतने केलेल्या विकासकामांबद्दल कृतज्ञता, शाळेतील शिक्षकांना निरोप व नवीन शिक्षकांचे स्वागत समारंभ म्हणून हनुमाननगर शाळा व शालेय समितीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सध्याचे गतिमान आणि स्पर्धेचे युग असल्याने शाळेच्या भौतिक व सर्वांगीण सुविधा मध्ये हनुमाननगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शाळेतील विद्यार्थी मागे राहु नये, शालेय व्यवस्थापन शिक्षण समिती […]

सविस्तर वाचा

संत रोहिदास महाराजांनी एकात्मतेचा संदेश दिला: सुरेशानंदजी शास्त्री महाराज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- संत रोहिदास महाराजांनी विविधतेतून एकात्मतेचा संदेश दिला. सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. तसेच कर्म हीच पूजा असल्याचे संत रोहिदास महाराजांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले, असे प्रतिपादन हभप गुरुवर्य महंत सुरेशानंदजी महाराज शास्त्री (श्री क्षेत्र शृंगऋषीगड) यांनी केले. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित […]

सविस्तर वाचा

देडगाव शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना निरोप व नव्याने आलेल्या शिक्षकांचे स्वागत 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील एकाच वेळी चार शिक्षकांची बदली झाली. आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना निरोप देण्यात आला. तर बदली प्रक्रियेतून नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.  बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देण्यासाठी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष […]

सविस्तर वाचा

देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परिसर भेट उपक्रम यशस्वी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परिसर भेट उपक्रम घेण्यात आला. शाळेत प्रथम नव्याने हजर झालेल्या मुख्याध्यापिका श्रीमती वनिता चिलका, सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर शाळेच्या परिसरातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर येथे परिसर भेट देण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर […]

सविस्तर वाचा

महंत सुनीलगिरीजी महाराज यांची संत रोहिदास महाराज देवस्थानला सदिच्छा भेट

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास महाराज देवस्थानला महंत सुनीलगिरीजी महाराजांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संत रोहिदास महाराज मूर्तीचे महंत सुनीलगिरीजी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, संत रोहिदास महाराज देवस्थानचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पावन गणपती देवस्थानचे तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे, माजी […]

सविस्तर वाचा

माका महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून तृतीय व द्वितीय वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम उत्कृष्टरित्या पार पाडले . प्राचार्य , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भूमिका उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांनी पार […]

सविस्तर वाचा

अहिल्याबाई होळकर विद्यालयात पर्यावरण पूरक गणेश विसर्जन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,देडगाव येथे आज पर्यावरण पूरक पद्धतीने गणेशाचे विसर्जन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड एस.के.यांच्या हस्ते गणरायाची आरती करून आनंदमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला व शालेय मैदानावर फुलांनी सजवलेले पात्र विद्यार्थ्यांनी तयार केले व गणपती विसर्जनाचे नियोजन केले. विद्यार्थिनींनी रांगोळी काढून सुंदर सजावट केली. सर्व विद्यार्थ्यांना […]

सविस्तर वाचा