मंत्री, आमदारांनी विचार करुन बोला; मुख्यमंत्र्यांनी सुनावले 

जनशक्ती (वृत्तसेवा)- आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यावर प्रतिक्रिया देत आमदारांना दम दिला आहे. प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोलण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्या आहेत. अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारच्या योजनांवरती परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले. आज महाराष्ट्र […]

सविस्तर वाचा

दत्तात्रय भिंगारे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शिवस्वराज बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार कौठा येथील पत्रकार दत्तात्रय भिंगारे यांना जाहीर झाला असून ११ ऑगस्ट २०२४ ला शिर्डी येथे हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे संस्थेचे सचिव ताईसाहेब वाघमारे यांनी सांगितले. नेवासा तालुक्यातील कौठा येथील पत्रकार दत्तात्रय भिंगारे यांनी गेल्या ३० वर्षापासून पत्रकारितेत काम करत आहेत. […]

सविस्तर वाचा

देडगाव येथे कुशाबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील टकले वस्ती येथे कुशाबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण श्रीराम साधना आश्रम रामनगरचे मठाधिपती महंत सुनीलगिरी महाराजांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाचे दोन दिवसापासून आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (दि.८) मूर्तीची गावातून फटाक्याच्या आतषबाजीमध्ये, पारंपारिक नृत्य, गजढोल, गजनृत्य व महिलांचे पारंपारिक भावगीते तसेच विविध कार्यक्रमाने सजवलेले […]

सविस्तर वाचा

देडगावचे भूमिपुत्र गणेश मुंगसे यांचा नागरी सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र गणेश गोरक्षनाथ मुंगसे (लालगेट) यांची आरोग्य अधिकारी (लातूर) व कॅनॉल इन्स्पेक्टर (संभाजीनगर) या दोन पदावर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक जनार्धन कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. यावेळी सागर बनसोडे […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे उद्या कुशाबाबा देवाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या गुरुवारी (दि.८) कुशाबाबा देवाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकाळी ८ वाजता कुशाबा मूर्तीची गावातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये गजी ढोल, गजी नृत्य, लेझीम व पारंपारिक वाद्याच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक होणार आहे. तसेच पारंपारिक वेशभूषा व भक्तीगीते सादर करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (दि.९) श्रीराम […]

सविस्तर वाचा

माका महाविद्यालयातील प्रा.काळे व प्रा.पाटील सेट (SET) परीक्षेत उत्तीर्ण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, माका येथील रसायनशास्त्र विषयात प्रा. शाहीदास भाऊसाहेब काळे व भौतिकशास्त्र विषयात प्रा. शुभम निलेश पाटील यांनी एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या सेट (SET) परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. प्रा. शाहीदास भाऊसाहेब काळे व प्रा. शुभम निलेश पाटील यांचे ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, आमदार […]

सविस्तर वाचा

सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर देशमुख यांच्याकडून नवे देडगाव शाळेला पुस्तके भेट

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील नवे देडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बालवाचनालयास सामाजिक कार्यकर्ते,अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली शेठ) देशमुख यांनी शैक्षणिक, सामाजिक, ऐतिहासिक, विज्ञान, गणित, इंग्रजी स्पर्धा परीक्षा विषयक तसेच थोर महापुरुषांचे पुस्तके भेट दिली. यावेळी ग्रामस्थांकडून त्यांचा जाहीर सत्कार करुन या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी […]

सविस्तर वाचा

आमदार गडाख यांनी फक्त बोलून नाही तर प्रत्यक्ष करून दाखवले: मिराबाई महाराज मिरीकर

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- कोणत्याही कार्याची ठराविक वेळ यावी लागते. ४० वर्षांपूर्वी या सप्ताहाची सुरुवात ताडपत्रीच्या मंडपामध्ये करण्यात आली होती. परंतु आज आमदार शंकरराव गडाख यांच्या ४० लाखाच्या निधीतून भव्य दिव्य असा सभामंडप तयार झाला, हे कार्याचे फलित आहे. त्यांनी फक्त बोलून दाखवले नाही तर प्रत्यक्ष कृतीतून दाखविले, असे प्रतिपादन मिराबाई महाराज मिरीकर यांनी केले. नेवासा […]

सविस्तर वाचा

तांबे वस्ती येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे सालाबादप्रमाणे संत सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवर्य हभप मीराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. हा सप्ताह 38 वर्षापासून अखंड चालत आलेला असून याही वर्षी सप्ताहात नामांकित महाराजांची किर्तनरुपी सेवा पार पडली. सांगता समारंभाच्या आदल्या दिवशी संत सावता महाराज यांच्या […]

सविस्तर वाचा

तांबे वस्ती येथील सावता महाराज मंदिर सभामंडपाचे उद्या लोकार्पण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सावता महाराज मंदिर, तांबे वस्ती येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या ४० लक्ष रुपये किमतीच्या सभा मंडपाचे लोकार्पण उद्या दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख व हभप गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांच्या शुभहस्ते […]

सविस्तर वाचा