बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- रंगोत्सव सेलिब्रेशन मुलुंड ,मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या रंगोत्सव सेलिब्रेशन हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेत नेवासा तालुक्यातील माका येथील कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सदर स्पर्धा परीक्षेत स्कूलचे एकूण 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील 18 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व रजत पदक मिळाले आहेत. अशी माहिती रंगोत्सव सेलिब्रेशन चे प्रमुख प्रशांत दाते यांनी दिली.सदर स्पर्धेत स्वराली सोमनाथ बजांगे, त्रिवेणी अभिजीत गायके, आरव पोपट शिरसाठ, कृष्णा राजेंद्र वाघमारे, आर्यन अजित लोंढे, संस्कृती सोमनाथ लोंढे, शौर्य संतोष नरवडे, यश गणेश कराळे, अथर्व कृष्णा केकान, किरण संदीप केदार, भावेश महेश जाधव, पृथ्वीराज परमेश्वर सानप, शौर्य अनिल गायके, स्वरांजली देविदास खेमनर, सिद्धार्थ आदिनाथ सानप, तनवी लक्ष्मण काळे, वैभव विष्णू साबळे, समृद्धी आजिनाथ कुऱ्हाडे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत सुवर्णपदक व रौप्य पदक मिळविले आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर अनेक विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविले जातात. सर्व स्टाफने वर्षभर तळमळीने, निष्ठापूर्वक, केलेल्या कामाची ही पावती आहे. एकच वेळी, एकाच परीक्षेत, एकाच शाळेचे 18 विद्यार्थी सुवर्ण पदकांचे मानकरी ठरले आहे. ही मोठी कमाई आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांनी केले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे, संचालिका मीना बनसोडे यांचेसह ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
