बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब तसेच सर्वसामान्य जनतेला त्यांचा हक्क मिळवून दिला. सर्वसामान्यांना मिळालेल्या हा हक्कांमुळे त्यांचा उद्धार झाला, असे प्रतिपादन बालाजी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी सरपंच मुंगसे बोलत होते.
बालाजी देडगाव येथील ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, सेवा संस्थेचे चेअरमन सागर बनसोडे, ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, युवा नेते फकीरचंद हिवाळे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनील मुथ्था, पत्रकार युनूस पठाण, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर खांडे, युवा नेते निलेश कोकरे, आशिष हिवाळे, नितीन हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास हिवाळे, बलभीम सकट, सचिन हिवाळे, पांडुरंग रक्ताटे, अशोक जावळे, नामदेव वांढेकर संजय कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
