तेलकुडगाव येथे हिंदवी स्वराज्य धर्मध्वज लोकार्पण, धर्मसंमेलन व राजमुद्रा अनावरण सोहळा उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- तेलकुडगाव येथे संत महंताच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य धर्मध्वज लोकार्पण, धर्मसंमेलन राजमुद्रा अनावरण सोहळा संपन्न झाला. हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, जे-जे लढले त्या सर्वांच्या आस्थेचे व हिंदूधर्म प्रतीक म्हणून हा भव्यदिव्य धर्मध्वज संत महंत मुख्य धर्माचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू नुतनवर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तेलकुडगावच्या पावनभुमीत चैतन्य नागनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि सकल हिंदू समाज बांधवांचा ग्रामस्थांचा उपस्थितीत सफल झाला. या धर्मसंमेलन सोहळ्यात शुभार्शीवाद व मार्गदर्शन करण्यासाठी महंत गुरूवर्य हभप भास्करगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान), महंत गुरूवर्य हभप रामगिरीजी महाराज (श्री क्षेत्र सरला बेट), वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के (श्री क्षेत्र ज्ञानेश्वर माऊली संस्थान नेवासा), गुरूवर्य हभप जंगले महाराज शास्त्री (श्री क्षेत्र डोंगरगण), महंत स्वामी हभप प्रकाशानंदगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान), गुरुवर्य हभप राम महाराज झिंजुर्के (श्री सद्गुरु जोग महाराज संस्थान, आखेगाव), महंत रमेशानंदगिरीजी महाराज (श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर संस्थान, हंडीनिमगांव), हभप रमेश आप्पा महाराज (श्री क्षेत्र हनुमानटाकळी देवस्थान), रामायणाचार्य हभप सोमेश्वर महाराज गवळी, (वैष्णव सेवा आश्रम, बऱ्हाणपूर), हभप भगवानजी महाराज जंगले शास्त्री (रामकृष्ण आश्रम गोणेगांव), हभप सुनीलगिरीजी महाराज (श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर), हभप निलेश महाराज वाणी (वैष्णव सेवा आश्रम बऱ्हाणपूर), हिंदू धर्मरक्षक सागर भैय्या बेग श्रीरामपूर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच समवेत आलेले हभप मोहीत महाराज, हभप चंद्रकांत महाराज, भैरट महाराज, परिसरातील या सर्व संत महंत धर्माचार्याचें श्री क्षेत्र तेलकुडगावच्या नगरीत भव्यदिव्य स्वागत करण्यात आले या धर्मकार्यात नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, श्री क्षेत्र सरला बेट विश्वस्त बाबासाहेब पाटील चिडे, अंकुशराव काळे, नवनाथ सांळुके उपस्थित होते. यावेळी भव्यदिव्य ” रथ मिरवणूक, टाळ-मृदंग भजन, झेंडे-पताका, वारकरी संप्रदायातील वारकरी पावली खेळत, सर्व महाराज मडळी, सर्व भजनी मंडळी, पारंपरिक लेझीम सांस्कृतिक कार्यक्रमातील सर्व मुली-मुले, सडा, रांगोळी, कलश, शोभेची आतिषबाजी करत ग्रामस्थांच्या उपस्थितीत संत महंताचे स्वागत करण्यात आले.
संत महंताच्या शुभहस्ते धर्मध्वज पुजन करत राजमुद्रा कोनशिला अनावरण करुन अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. तद्नंतर धर्ममंडपात संत महंत यांचे ग्रामस्थांच्या वतीने संतपुजन करण्यात आले. धर्मसंमेलन कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच सतिशराव काळे पाटील यांनी केले. संत महंतांनी धर्मसंमेलन सोहळ्यात उपस्थितांना धर्मपर मार्गदर्शन केले.
तेलकुडगावच्या पावनभुमीत आपल्या व येणाऱ्या पिढीला तरुण बांधवाना धर्मप्रेम कळावे, संत महंताच्या पदस्पर्शाने व उपस्थितीत धर्मध्वज स्थापन झाल्याने सर्व गावकरी, हिंदू बांधव आनंद व्यक्त करत धर्मप्रेरणा मिळाली आहे. धर्म संमेलन कार्यक्रमानंतर सकल हिंदू बांधव व गावकरी बंधूंच्या वतीने भव्य दिव्य महाप्रसादाची पंगत संपन्न झाली.
या धर्मकार्यात सर्व सकल हिंदू बांधव, समस्त ग्रामस्थ, महिला भगिनी पंचक्रोशितील हिंदू धर्मप्रेमींनी मोठ्या बहुसंख्येने या धर्मकार्यात उपस्थित राहिले. धर्मसंमेलन कार्यक्रमास संत, महंत, उपस्थितांचे श्रमदानासह आर्थिक सहकार्य करणारे सर्वाचे आभार प्रदर्शन हभप अमोल महाराज घाडगे यांनी केले. शिवचरित्रकार हभप गणेश महाराज चौधरी यांनी सुत्रसंचलन केले. धर्मसंमेलन सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष असे सहकार्य सर्व महाराज मंडळी, सर्व भजनी मंडळी, समस्त ग्रामस्थ, महिला भगिनीं सर्व स्वंयसेवक म्हणून गावातील सर्व मित्र मंडळी, विविध मंडळे-ग्रुप, सर्व हिंदूप्रेमीचे अनमोल सहकार्य लाभले.