हभप अतुल महाराज आदमाने यांच्या किर्तनासाठी भाविकांची मांदियाळी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात रविवारी (दि.१३) हभप अतुल महाराज आदमाने (निपाणी निमगाव) यांच्या किर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तनसाठी जेऊर हैबती व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी घनश्याम महाराज म्हस्के, भागवत आप्पा वाघमारे, सोमनाथ रिंधे, सोपान गायकवाड, अर्जुन शिंदे (साहेब) , सुनिल ताके, गणेशराव उगले (धनलक्ष्मी फर्निचर कुकाणा), अनिल उगले, अशोक दादा ताके, रामनाथ ताके, परशुराम बागडे, डॉ. राजेंद्र म्हस्के, राऊसाहेब मामा ताके, बाळासाहेब कोंडीराम ताके, गणेश माळवदे, माऊली म्हस्के, शरदराव शिंदे (ग्रामपंचायत सदस्य), भास्कर आण्णा उगले, संभाजी महाराज म्हस्के, रामभाऊ कराळे, किसनबापू ताके, अशोक आप्पा खराडे, गोरक्षनाथ रिंधे, कानडे सर, शिवाजी कपिले, निवृत्ती म्हस्के, शंकर आप्पा म्हस्के, मामा उगले, बाबुराव फुलमाळी, भारत तांबे, गायणाचार्य अनिल महाराज गरुड, कैलास महाराज कोहक, शंकर महाराज गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. या सप्ताहात आज सोमवारी (दि.१४) हभप कृष्णाजी महाराज ताठे (चितळी) यांची किर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे. तरी जेऊर हैबती व परिसरातील भाविकांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ जेऊर हैबती यांनी केले आहे.