देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. शाळेत विविध भीमगीतांवर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य केले. शाळेचे मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ यांनी चित्रीत केलेले महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकांचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदर्शन करण्यात आले. विद्यार्थी,ग्रामस्थ,शिक्षक व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. कार्यक्रमाला देडगाव ग्रामपंचायत सदस्य पोपट मुंगसे, आनंद दळवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब दळवी,उत्तम सकट, दानियल दळवी, अविनाश दळवी, प्रदिप मिरपगार, महेश दळवी, योसेफ दळवी, प्रकाश दळवी, सिमोन दळवी, दिपक दळवी, विलास दळवी, अशोक दळवी, संभाजी दळवी, सुनिल दळवी, शाम दळवी, योहान दळवी, अमोल कोल्हे, संदिप दळवी,सुनिल कोल्हे,सनी आढाव,संतोष दळवी,राकेश दळवी,ईश्वर भवार,गहिनीनाथ भवार आदी पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ व आभार सहशिक्षिका मनिषा कांबळे यांनी मानले.