बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथमतः गावात जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, झाडे लावा झाडे जगवा म्हणत गावात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती . प्रभात फेरीनंतर शाळेच्या प्रांगणात ध्वजपूजन व राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते करण्यात आले. तर ज्येष्ठ नागरिक शिक्षणभूषण बाजीराव पाटील मुंगसे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले. विद्यार्थ्यांनी वंदे मातरम,राष्ट्रगीत म्हणत सर्वांनी ध्वजाला सलामी दिली तर देशभक्तीपर गीतांनी वातावरण देशभक्तिमय केले.
मुख्याध्यापक संभाजी कडू सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी लेझीम , डंबेल्स वर कवायत,देशभक्तीपर भाषणे, कविता, गीते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाची माहिती सांगत देशप्रेमाचा संदेश दिला. तर शाळेसाठी भव्य असे मुलींचे स्वच्छातागृहाचे बांधकाम एस एम ॲटो पुणे यांच्या सौजन्याने केल्याबद्दल दत्ता पाटील मुंगसे यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.
तसेच श्रीमती सुवर्णा जाधव मॅडम यांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त एक वर्ग खोली मध्ये डिजिटल फ्लेक्स बोर्ड बसून दिले. त्याचे उद्घाटन करण्यात आले. संपत ससाने व बालाजी केटरर्सचे भगवान मुंगसे यांनी शाळेसाठी देणगी दिली. विकास तांबे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सजावट करून दिली तर बथूवेल हिवाळे सर यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त विद्यार्थ्यांना गोड जेवण दिले.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, संविधानाची मूल्ये आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. कार्यक्रमास माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, मेजर संजय काळे मेजर सोमनाथ मुंगसे, मच्छिंद्र मुंगसे, केंद्रप्रमुख भास्कर ताबे सर ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार इन्नूस पठाण संभाजीराजे काजळे, माजी उपसरपंच महादेव पुंड,
पोपट बनसोडे, माजी पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाहूरवाघ, नांगरे गुरुजी, सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब सावंत, बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष नवनाथ मुंगसे, विजय चेडे,दत्ता पाटील मुंगसे , अन्वर सय्यद, पांडुरंग एडके, संपत ससाने,शरद मुंगसे ,
अमोल मुंगसे, अरुण वांढेकर , हरिभाऊ मुंगसे , हरी मुंगसे , रमाकांत तांदळे , अशोक औटी कारभारी कुटे , डॉक्टर झावरे ,शिवाजी कोकरे , इ पालक व भगिनी वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी कडू सर ,सहशिक्षक मदन लाड, सुवर्णा काळे मॅडम,सुवर्णा जाधव मॅडम,संध्या मुंगसे मॅडम,वैशाली पवार मॅडम व विद्यार्थी, यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख भास्कर तांबे साहेब यांनी केले तर आभार मदन लाड सर यांनी मानले.

