जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्तापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील रस्तापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात संपन्न झाला. 15ऑगस्ट रोजी सकाळी इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील सर्व मुलामुलींची संपूर्ण गावातून स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत सवाद्य फेरी काढण्यात आली. प्रथम रस्तापूर ग्रामपंचायत आवारात ज़िल्हा परिषद शाळा आणि सौ. कै. कमलाबाई हरिभाऊ अंबाडे या दोन विद्यालयातील विद्यार्थी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, माजी विद्यार्थी यांनी वंदे मातरम गीताने सुरुवात करून राष्ट्रागीताने राष्ट्राध्वजाला मानवनंदना दिली. सरपंच हिराबाई कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आदिनाथ भोंदे सर यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर ज़िल्हा परिषद शाळेत मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. शाळेत गावातील जेष्ठ कार्यकर्ते नारायण अंबाडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी तरुण युवकनेते अरुण सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मुलींनी स्वागत गीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. नंतर संगीतमय कवायात सर्व मलामुलींनी सादर करून उपस्थित पाहुणे आणि ग्रामस्थांची मने जिकंली नंतर मुलामुलींची वर्गानुसार भाषणे, गिते सादर करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवी वर्गातील सर्व गुणवंत विद्यार्थी त्याचबरोबर वर्गशिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक आदिनाथ भोंदे सर, इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक प्रकाश गायकवाड सर, इयत्ता सातवीच्या वर्गशिक्षिका अनुराधा आल्हाट मॅडम, इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका सुजाता किंबहुणे मॅडम यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्याध्यापक आदिनाथ भोंदे सर यांनी त्यांच्या प्रास्तविक भाषणात शाळेतील विविध उपक्रमाबाबत माहिती देवून आपले सर्व मुले ज़िल्हा परिषदेच्याच शाळेत पाठवण्याचे आवाहन केले. इंग्रजी विषयाबरोबर गणित, मराठी या विषयाचा पाया आणि सर्वांगीण शिक्षण ज़िल्हा परिषद शाळेतच मिळते असे सांगितले. त्यानंतर शिक्षण तज्ञ आबासाहेब भाकड सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की माझी कन्या अर्चना भाकड या तहसीलदार पदावर तर मुलगा कामगार तलाठी पदावर कार्यरत असून दोन्हीही या रस्तापूर ज़िल्हा परिषद शाळेचे नुकतेच शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी असून आपली मुले यापुढे ज़िल्हा परिषद शाळेत पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रकाश गायकवाड सर आणि ग्रामस्थ रिंधे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अधीक्षय भाषणात शाळेला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन अरुण सावंत यांनी दिले.कार्यक्रमाला माजी ज़िल्हा परिषद सदस्या विजयाताई अंबाडे, माजी ज़िल्हा परिषद सदस्य नानासाहेब अंबाडे, सरपंच हिराबाई कोकाटे, उपसरपंच अण्णासाहेब झुंबर अंबाडे, डॉ. भाकड, नूरमहंमद सय्यद, ग्रामपंचायत सदस्य सुरेश डाके, ग्रामपंचायत सदस्य अनिल विठ्ठल वैरागर, विठ्ठल भाकरे, संजय भाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, उपाध्यक्ष सीमा सिद्धिनाथ गाढवे, गणेश सावंत, दिपक भाकड, प्रल्हाद अंबाडे रमेश उकिरडे, बाळासाहेब उकिरडे, अमर सातदिवे, दिपक हारकळ, रामभाऊ हारकळ, माजी सरपंच बाळासाहेब हारकळ, महेमूद सय्यद, सिकंदर शेख, सिराज सय्यद, खालिद सय्यद, ग्रामसेवक सोनवणे, सचिन मचे, अंगणवाडी सेविका शहाजहान सय्यद, शहानूर शेख , वैशाली भाकड, स्वेता गांधी, मीरा माळी, नौसर शेख उपस्थित होते.इयत्ता सातवीचा विद्यार्थी याचा ज़िल्हा गुणवत्ता यादीत आलेल्याश्लोक आदिनाथ पानसरे आणि त्याच बरोबर इयत्ता चौथी, पाचवी, सातवी वर्गातील सर्व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. पदवीधर शिक्षक शिवनाथ कुसळकर, नीलम धामणे मॅडम यांचा देखील सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक आदिनाथ भोंदे सर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. सूत्रसंचालन संजय हारकळ सर यांनी केले तर आभार श्री प्रकाश गायकवाड यांनी मानले.