संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त भाविकांची मांदियाळी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  जानापूर (वाघमारे वस्ती- पाचुंदा रोड) येथील संत सेना महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज सच्चीतानंद श्रीपाद बाबा, सदगुरु काटे महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने व गुरुवर्य ह.भ.प. आण्णा महाराज बोरुडे यांच्या अधिपत्याखाली मंगळवारी (ता. ८) संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत कीर्तनभूषण ह.भ.प. भगवान महाराज गडदे (आळंदी देवाची) यांची किर्तनसेवा पार पडली. कीर्तनानंतर आरती व नंतर अण्णासाहेब रामनाथ वाघमारे यांच्याकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, पत्रकार आदिनाथ म्हस्के, भानुदास म्हस्के, निंबेनांदूर पोलीस पाटील बबनराव बुधवंत, युवा नेते मच्छिंद्र मुंगसे, नवनाथ माने आदी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराच्या साऊंड सिस्टीमसाठी विशेष देणगी देणाऱ्या प्रशांत शिंदे साहेब, जयदीप जमादार साहेब यांचा मंदिर समितीच्या वतीने महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समस्त वाघमारे परिवार, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ समाज बांधव माका – निंबेनांदूर -पाचुंदा यांनी विशेष परिश्रम घेतले.