बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- भातकुडगाव येथील सुमनबाई मोहन गायकवाड यांचा तेरावा विधी उद्या शनिवार दि. २४/१०/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता गायकवाड वस्ती भातकुडगाव येथे होत आहे.
तेराव्याच्या दिवशी श्रीक्षेत्र चैतन्य नागनाथ देवस्थान तेलकुडगावसाठी कचरू मोहन गायकवाड बिल्डर्स वाघोली पुणे आणि कुशिनाथ मोहन गायकवाड हे देवस्थानचे अध्यक्ष हनुमंत गटकळ आणि देवस्थानचे सचिव मेजर अर्जुन गायकवाड यांच्याकडे देणगी सुपूर्द करतील. तसेच रेणुका माता देवस्थान तेलकुडगावसाठी देणगी प्रा. मधुकर घाडगे आणि काकासाहेब काळे यांच्याकडे सुपूर्द करतील. तसेच मुंजोबा देवस्थान भातकुडगावसाठी देणगी सुपूर्द केलेली आहे.
तसेच दशक्रिया विधीनिमित्त वेदांतचार्य डॉ. प्रा. शरदचंद्रजी महाराज शास्त्री आळंदीकर यांचे कीर्तन झाले त्याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलकुडगाव विद्यार्थ्यांसाठी वही आणि पेनाचे वाटप करण्यात आले.वही पेन शाळेचे शिक्षक संतोष लोणारे सर यांनी स्वीकारले.
तरी तेरावा विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कचरू मोहन गायकवाड (मुलगा), कुशीनाथ मोहन गायकवाड (मुलगा), उषाताई विनायक वाघमारे( मुलगी), तुळशीराम नारायण गायकवाड (दिर) संतोष निवृत्ती गायकवाड (पुतणे), कावेरी बापूसाहेब भोसले (पुतणी) व समस्त गायकवाड परिवार यांनी केले आहे.

