बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (SCERT) अंतर्गत दिला जाणार राज्य आयडॉल शिक्षक पुरस्कार जि.प .प्राथमिक शाळा कुटेवस्ती येथे कार्यरत असणारे शिक्षक सुनिल गायकवाड सर यांना जाहीर झाला. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.कुटेवस्ती शाळेत मागील एका वर्षांपासून सुनिल गायकवाड सर आणि सीमा गायकवाड मॅडम हे शिक्षक दाम्पत्य कुटेवस्ती येथे कार्यरत आहे.
कुटेवस्ती येथे असणारी विद्यार्थी प्रगती, विविध स्पर्धा परीक्षेसाठी घेतली जाणारी तयारी, विवीध गुणदर्शन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची असणारी तयारी, विद्यार्थी हस्ताक्षर, सांस्कृतिक वारसा,संस्कृती विद्यार्थ्यांना माहिती व्हावी ती टिकून राहावी, यासाठी शाळेमध्ये घेतले जाणारे विविध उपक्रम घेतले जातात, विद्यार्थी इंग्रजी विषयाची तयारी, स्पेलिंग बी (स्पेल्लिंग पाठांतर) स्पर्धेत देडगाव केंद्रात व नेवासा तालुक्यात मिळालेले यश, शाळेची विद्यार्थी, बौद्धिक प्रगती, तसेच भौतिक प्रगतीसाठी पालकांचा आर्थिक व वस्तूरूपाने हातभार असे विविध उपक्रम गायकवाड सर आणि गायकवाड मॅडम कुटेवस्ती शाळेमध्ये राबवत आहेत. यामुळे शाळेची प्रगती उत्तम होत आहे. शाळेच्या प्रगतीसाठी पालकांचा ही उत्कृष्ट सहभाग मिळत आहे. सुनिल गायकवाड सर आणि सीमा गायकवाड मॅडम यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची शासनाने दखल घेत गायकवाड सर यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (SCERT) अंतर्गत दिला जाणार राज्य आयडॉल शिक्षक पुरस्कार जाहीर केला.
गायकवाड सरांच्या यशाबद्दल देडगावचे सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, ग्रामविकास अधिकारी उल्हारे भाऊसाहेब, कुटेवस्ती येथील ग्रामस्थ, ज्ञानदेव कदम सर देवी वस्ती, संभाजी काजळे पाटील, संतोष कुटे, ज्येष्ठ शिक्षक सावंत सर, शिक्षक नेते लाड सर, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, युवा पत्रकार युनूसभाई पठाण, देडगावचा माजी विद्यार्थी संघ, कुटेवस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष, शिक्षण तज्ञ, व सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, देडगाव व कुटेवस्ती येथील ग्रामस्थ यांनी अभिनंदन तसेच कौतुक केले. गायकवाड सर तसेच कुटेवस्ती शाळेला गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड साहेब साहेब ,विस्तार अधिकारी लोंढे साहेब, केंद्रप्रमुख भास्करराव तांबे साहेब ,केंद्र प्रमुख सतिशकुमार भोसले सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.

