बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील वै. ह.भ.प. रामायणाचार्य दत्तोबा महाराज रिंधे यांचे पाचवे पुण्यस्मरण बुधवारी (ता. १ एप्रिल) जेऊर हैबती येथील श्री क्षेत्र पावण हनुमान मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती दत्तोबा महाराज रिंधे यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते शंकरराव रिंधे पाटील यांनी दिली.
ह.भ.प. दत्तोबा महाराज रिंधे यांच्या पुण्यस्मरणार्थ बुधवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत संत चरित्र कथाकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज रिंधे यांचे रसाळ वाणीतून किर्तन आयोजित करण्यात आले आहे. तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन शंकरराव रिंधे व समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ जेऊर हैबती यांनी केले आहे.

