बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बालाजी देडगाव येथील जनार्दन कदम व तेलकुडगाव येथील मच्छिंद्र म्हस्के यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल बालाजी देडगाव येथे ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके मित्र मंडळाच्या वतीने जनार्धन कदम व मच्छिंद्र म्हस्के यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, शिक्षक नेते संजयकुमार लाड कैलासनाथ मित्र मंडळाचे अरुण वांढेकर, प्रगतशील शेतकरी चांगदेव महाराज तांबे, राजू एडके आदी मान्यवर उपस्थित होते.


