बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिर देवस्थान येथे चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त सुनील बाळासाहेब कडू, बालाजी देवस्थानचे विश्वस्त संतोष लहानू कुटे, जनाभाऊ बन्सी तांबे यांच्या शुभहस्ते अभिषेक व आरती करण्यात आली.
यानंतर कडू, कुटे व तांबे परिवारकडून भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, भाजपचे आकाश चेडे, प्रशांत तांबे, कैलासनाथ देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कदम, मधुकर क्षिरसागर, विठ्ठल क्षिरसागर, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, अरुण वांढेकर, हरिभाऊ देशमुख, बाळासाहेब वांढेकर, भैरव मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी महादेव मंदिर देवस्थान, कैलासनाथ मित्र मंडळ व यांनी विशेष परिश्रम घेतले.

