पाचुंदा सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत होंडे यांची बिनविरोध निवड

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत रामराव होंडे यांची सोसायटीच्या संचालकाच्या उपस्थितीत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर नारायण गोयाजी वाघमोडे यांना पुन्हा उपाध्यक्षपदाची संधी देऊन कायम करण्यात आले. ही निवड माजी मृद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली  पार पडली असून या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एन. के. वनवे यांनी आपल्या अधिकाराखाली विशेष काम पाहिले. तर सोसायटीचे सचिव भाऊसाहेब  होंडे व शहाजी  होंडे या कर्मचाऱ्यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी माणिकराव शंकर होंडे यांनी सूचना मांडली तर अनुमोदन अनिल सुखदेव होंडे यांनी दिले. तर आदिनाथ भाऊसाहेब होंडे, एकनाथ गंगाधर  होंडे, उस्मान कासम सय्यद, आबाजी नाथा कोकरे, भाऊसाहेब विठ्ठल होडगर, चंद्रकांत सूर्यभान वैरागर, देविदास गोरक्षनाथ वाघमारे,  उषाताई बाबासाहेब होंडे, शांताबाई भाऊसाहेब होंडे या संचालकांनी सह्या करत बिनविरोध निवडीला पाठिंबा दिला.
यावेळी माजी चेअरमन माणिकराव होंडे बोलताना म्हणाले की, आत्तापर्यंत सोसायटीचा कारभार पारदर्शक झाला असून सर्व सभासदांना विश्वासात घेऊन काम पाहिले जाते. सर्व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचे काम सोसायटीचे माध्यमातून होत असते. माझ्यावर अडीच वर्ष जो संचालकांनी विश्वास ठेवला, त्याला मी पात्र राहून स्वेच्छेने राजीनामा दिला व रोटेशनप्रमाणे नूतन चेअरमनला संधी दिली. त्यानिमित्ताने या पुढील काळातही नूतन चेअरमन पारदर्शक काम करून सर्व सभासदांच्या अडचणी सोडवतील व सोसायटी नफ्यात आणण्याचा प्रयत्न करतील, असे म्हणत पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.
यावेळी बाबासाहेब होंडे, अशोक रामभाऊ होंडे, युवा नेते गणेश होंडे, माजी चेअरमन साहेबराव होंडे, पोपटराव हंडाळ ,युवा नेते उमेश हंडाळ, विश्वनाथ  होंडे, तर ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच आदिनाथ वाघमोडे, मा. उपसरपंच पोपटराव वाघमोडे ,ग्रामपंचायत सदस्य खंडेश्वर वाघमोडे , तंटामुक्ती अध्यक्ष मोहनराव चोपडे, उपाध्यक्ष साईनाथ माने, अंबादास माने, बाबासाहेब गोफने, दादा भिसे, आजिनाथ होंडे, हरिभाऊ होंडे, शिवाजी वाघमोडे, राधाकिसन खरात, अनिलराव आगळे, उमाजी होंडे ,मनाजी कोकरे, संभाजी होंडे, जामदार सय्यद ,खंडू चोपडे, बाबासाहेब कोकरे, रंगनाथ  होंडे, सुखदेव शिंदे, डॉ. होटकर, आबा होटगर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून नूतन चेअरमन यांचा सन्मान करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी चेअरमन साहेबराव होंडे यांच्या वतीने वैयक्तिक माजी चेअरमन व विद्यमान चेअरमन यांचा सन्मान करण्यात आला. तर विविध संघटनेच्या, शाखेच्या वतीने नूतन अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देत सन्मान करण्यात आला.