कृषी विद्यापीठ पुणे येथे ग्राफिक्स डिझायनरपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रशांत वांढेकर यांचा नागरी सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील चि. प्रशांत संदीप वांढेकर यांची सावित्राबाई फुले कृषी विद्यापीठ पुणे येथे ग्राफिक्स डिझायनर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणभूषण बाजीराव पाटील मुंगसे होते तर प्रास्ताविक रघुनाथ कुटे  यांनी करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर बालाजी देवस्थानचे विश्वस्त खंडेश्वर कोकरे सर, सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त करत म्हणाले की, प्रशांत वांढेकर यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर हे यश संपादन केले असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहें. ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षण, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर विविध क्षेत्रांत यश मिळवावे, यासाठी प्रशांत वांढेकर यांची कामगिरी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.
सत्काराला उत्तर देत प्रशांत म्हणाला की,घरच्यांनी टाकलेल्या विश्वासाला मी पात्र झालो.याचा मला अभिमान आहे.व सन्मानाबद्दल मी सर्वांचा ऋणी राहील.

या नागरी सत्कार सोहळ्यात ह भ प बंडू महाराज वांढेकर,माजी चेरमन विजय चेडे, बालाजी देवस्थानचे सचिव ज्ञानदेव कदम, गणपत कोकरे,विश्वस्त सुभाष मुंगसे,पोपट बनसोडे, रामचंद्र कदम, बाळासाहेब कदम, किशोर कदम, शंकर वांढेकर, मच्छिन्द्र वांढेकर,मधुकर वांढेकर, जालिंदर वांढेकर, आदिनाथ वांढेकर, कानिफनाथ वांढेकर, लक्ष्मण तांबे, विठ्ठल टकले, ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी प्रशांत वांढेकर यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी मानले.